• Advertisement
 • Contact
More

  क्षुल्लक कारणावरून मोठ्या भावाने लहान भावावर केला चाकूने हल्ला, घुग्गुस येथील घटना

  क्षुल्लक कारणावरून मोठ्या भावाने लहान भावावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घुग्गुस शहरात उघडकीस आली आहे. याची तक्रार पीडित इसमाच्या पत्नीने घुग्गुस पोलिसात दाखल केली असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र कोंडवार असे आरोपीचे नाव आहे. तर किशोर कोंडावार असे जखमीचे नाव असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.

  जितेंद्र कोंडावार याचे लहान भाऊ किशोर कोंडवार यांच्यासोबत काही कारणावरून वाद सुरू होते. अशातच किशोर यांची पत्नी सपना कोंडावार यांना आरोपी जितेंद्र कोंडावार याने अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर किशोर याने मोठा भाऊ जितेंद्र याला हटकले असता आरोपी जितेंद्र कोंडावार याने चाकूने लहान भावावर हल्ला चढविला. यात किशोर कोंडवार यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.

  दरम्यान घुग्गुस पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी आरोपी जितेंद्र कोंडावार याच्यावर 323, 324, 504,506, कलमानूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

  नौशाद शेख, घुग्घुस प्रतिनिधि सर्च टि, व्ही,