• Advertisement
  • Contact
More

    पोलीस स्टेशन सिंदेवाही तर्फे अंधश्रद्धा मधून घडलेल्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर खांडला गावी अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम

    (प्रशांत गेडाम)
    सिंदेवाही – आज 11सप्टेंबर शनिवार ला पोलीस स्टेशन सिंदेवाही अंतर्गत तालुक्यातील येणाऱ्या मौजा खाडला, शिरकाडा, येथे गणेश उत्सव निमित्ताने चंद्रपूर जिल्ह्यामध्यील येणाऱ्या जिवती व नागभीड येथे नुकतेच जादूटोणा अंधश्रद्धा मधून घडलेल्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राध्यापक हरिभाऊ पाथोडे सर जिल्हाध्यक्ष अंधश्रद्धा निर्मूलन समिती चंद्रपूर हे होते. सदर कार्यक्रमांमध्ये भूत, भानामती,करणी, अंधश्रद्धा व जादूटोणा विरोधी कायदा या सारखे विषय घेऊन गावातील लोकांना विविध प्रात्यक्षिके दाखवून मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमाकरिता गावातील पोलीस पाटील व गणेश मंडळातील युवा कार्यकर्ते यांनी चांगले प्रतिसाद देऊन कार्यक्रम यशस्वी केला. अंधश्रद्धा व जादूटोणा बाबत लोकांमध्ये जनजागृती करणे हा या कार्यक्रमा मागील मूळ उद्देश होता. अशा प्रकारचे गुन्हे सिंदेवाही तालुक्यांमध्ये कोठेही घडू नये याकरिता सिंदेवाही पोलीस स्टेशनचे ठाणेदार घारे व पोलीस कर्मचारी हे दिवस-रात्र मेहनत घेऊन लोकांमध्ये अशाप्रकारे जनजागृती करीत आहे.