• Advertisement
 • Contact
More

  सोने विक्रीच्या नावावर हजारोंनी लुटले,दोघांना अटक

  चंद्रपूर :सोने विकायचे आहे, असे सांगून एका व्यक्तीची हजारो रुपयांनी लुट करणा-या दोन आरोपींना वरोरा पोलिसांनी अटक केली आहे. हे प्रकरण 23 जुलै रोजी उजेडात आले आहे.
  विजयनगर इंदौर निवासी राहुलबिहारी अशोक पीटर याने याबाबत वरोरा पोलिसांत तक्रार दाखल केली. गायकवाड फैल वणी जि. यवतमाल निवासी सोनू उर्फ दीपक पवार (38) व देवसरी तहसील उमरखेड जि. यवतमाल निवासी रवि काशीनाथ पवार (27) यांनी फिर्यादीस सोने विकण्याचा बनाव करून वरोरा येथे बोलाविले आणि 94,000 रुपये जबदस्तीने हिसकावून घेतले. तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
  ही कारवाई ठाणेदार दीपक खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय सर्वेश बेलसरे, दीपक दुबे, दिलीप सुर, किशोर बोढे, सुरज मेश्राम, मोहन निषाद, प्रवीण निकोडे, कपिल भंडारकर आदींनी केली.

  Leave a reply

  Please enter your comment!
  Please enter your name here