• Advertisement
  • Contact
More

    विद्यार्थ्यांच्या मदतीला वडेट्टीवार धावले एसआरपीएफची परीक्षा रद्द, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना दिलासा

    चंद्रपूर : एसआरपीएफच्या १७६ पदांसाठी ९ सप्टेंबरला परीक्षा घेण्याचे ठरले होते. मात्र, या पदासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट काढताना डोमिसाइल सादर न केल्याचा संदेश प्राप्त झाला. यामुळे चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार होते. याबाबतची तक्रार अनेक अनेक विद्यार्थ्यांनी बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी तत्काळ वडेट्टीवार यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर ही परीक्षा १५ दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री वडेट्टीवार यांनी दिली.
    तीन वर्षांपूर्वी एसआरपीएफच्या १७६ पदांसाठी अर्ज मागविण्यात आले. मात्र, त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव आल्याने परीक्षा होऊ शकली नाही. आता ही परीक्षा ९ सप्टेंबरला घेण्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर अर्ज करणारे विद्यार्थी हाल तिकीट काढण्यासाठी गेले असता त्यांना डोमिसाइल सादर न केल्याचा संदेश मिळाला. मात्र, डोमिसाइल सादर करण्याबाबत कोणतीही सूचना देण्यात आली नाही. आता परीक्षेची तारीख जाहीर झाल्यानंतर डोमिसाइलची मागणी केल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागणार होते.
    मात्र, आता वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. आता चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी नवीन अर्ज सादर करावे, असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले.