• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    परीक्षा शुल्कात कपात करण्याबाबत विद्यार्थ्यांचे भिक मांगो आंदोलन.

    धम्मशील शेंडे, चंद्रपुर

    चंद्रपुर :- अनेक महिन्यापासुन गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा शुल्काबाबत विद्यार्थी सतत निवेदने देत आहोत. परंतु विद्यापीठ प्रशासनाने दहा टक्के परीक्षा शुल्कात कपात करून विध्यार्थाची एक प्रकारे थट्टाच केली आहे.
    चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हयातील विद्यार्थी हा अतिदुर्गम भागात येत असून अनेक विद्यार्थी परीक्षा कोरोना महामारी व लॉकडाऊन मुळे अनेक पालक व विद्यार्थी वर्गात आर्थिक अडचण भासत आहे, त्यामुळे विद्यार्थी परीक्षा शुल्क भरू शकले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागत आहे. असे होऊ नये म्हणून विद्यापीठ प्रशासनाने लवकरात लवकर परीक्षा शुल्कात परीक्षा शुल्कात तात्काळ पूर्ण किंवा 50% तरी कपात करण्यात यावी. सरकारने विद्यार्थाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. आधीच सरकारने विद्यार्थाच्या खांद्यावर बेरोजगारीचा भर टाकला असून आजच्या घडीला विद्यार्थाकडे परीक्षा शुल्क भरायला पैसे नाही, त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात विद्यार्थी रस्त्यावर उतरला आहे. यासाठी विद्यार्थाकडुन भीक मांगो आंदोलन करण्यात आले. विद्यार्थाच्या प्रश्नाकडे विद्यापीठ प्रशासन दुर्लक्ष करून मागण्या मान्य करत नसेल तर जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना घेऊन उग्र आंदोलन करण्यात येईल आणि यास सर्वस्वी शासन आणि विद्यापीठ प्रशासन जबाबदार राहील असा इशारा यावेळी विद्यार्थ्यांनी दिला.