• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    कर्जा ला कंटाळून युवा शेतकऱ्याची आत्महत्या

    चंद्रपुर :- सततची नापिकी व डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर ह्यामुळे हताश होऊन राजू बंडू पारखी वय 34 वर्षीय युवा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना राजुरा तालुक्यातील धानोरा येथे उघडकीस आली.
    मिळालेल्या माहितीनुसार राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन जवळ असलेल्या धानोरा येथील युवा शेतकरी राजू पारखी ह्या शेतकऱ्याने निराशेतून व कर्जाला कंटाळून दिनांक 7 ऑगस्ट2021 च्या रात्री स्वतःच्या घरीच विष प्राशन केले. मात्र घरच्यांना ही गोष्ट लक्षात येताच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
    काही वर्षापासून सुरू असलेल्या नापिकी, कोरोना काळात आलेली आर्थिक अडचण व डोक्यावर असलेल्या कर्जाच्या ओझ्याचा भार सहन न झाल्याने त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले. या वर्षी उमेदीने त्याने शेतात पेरणी केली होती मात्र अतिवृष्टीमुळे शेतात पाणी शिरले व डोलदार होत असलेले पीक अचानक वाहून गेले त्यामुळे राजु पारखी सतत चिंता करीत होता.
    मात्र डोक्यावर असलेले कर्ज व शेताचे झालेले नुकसान याला कंटाळून त्याने विष प्राशन करून आपली जीवन यात्रा संपविली.
    त्याच्या जाण्याने कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून अवघे कुटुंब उघड्यावर पडले आहे.
    शासनाने कुटुंबीयांना तात्काळ मदत करावी अशी मागणी गावकरी करत आहे.