• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने शहरात सुरू झाले संडे मार्केट – महिला काँग्रेस च्या प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर यांचे मानले संडे मार्केट व्यावसायिकांनी आभार

    कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर राज्यात सर्वत्र कडक लॉक डाऊन होता पण त्यानंतर अनलॉक ची प्रक्रिया सुरू झाली तरी विकेंड लॉक डाऊन मुळे चंद्रपूर शहरातील संडे मार्केट मात्र बंद होते. दरम्यान संडे मार्केट च्या व्यावसायिकांनी  महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर यांच्या नेतृवात पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची दोनदा भेट घेतली तेव्हा पहिल्या भेटीत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्यात कोविड चे नियम शिथिल झाल्यास आणि कोरोनाची स्थिती आटोक्यात आल्यास तुमचा व्यवसाय सुरु होईल असे आश्वासन दिले होते.

    राज्यात जवळ जवळ सगळे नियम शिथिल झाल्यावर आठवड्या आधी या व्यावसायिकांनी पुन्हा पालकमंत्री वडेट्टीवार यांची भेट घेतली तेव्हा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने तसेच महानगरपालिका आयुक्त  राजेश मोहिते यांच्याशी  जिल्ह्यातील व शहरातील कोविड परिस्थिती बाबत आणि अनलॉक च्या प्रक्रियेबाबत चर्चा करून संडे व्यावसायिकांना आपला व्यवसाय करायची परवानगी दिली, त्यानुसार आज आझाद बगीच्या मार्गावर संडे मार्केट व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली.

    या सर्व प्रक्रियेत महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी पुढाकार घेतल्याने आज संडे व्यावसायिकांनी त्यांना निमंत्रित करून त्यांचे स्वागत केले व आभार मानले त्याच बरोबर नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी देखील या व्यावसायिकांना फुल देऊन प्रत्येकाला शुभेच्छा दिल्याया वेळी सामाजिक कार्यकर्ते मतीन कुरेशी, जिल्हा महिला काँग्रेस च्या उपाध्यक्षा सुनीता धोटे, जिल्हा सेवादलाच्या जिल्हाध्यक्षा स्वाती त्रिवेदी, शहर अध्यक्षा लता बारापात्रे, शहर सचिव हाजी अली, संदीप सीडाम, सुनील चौहान संडे मार्केट असोसिएशनचे हमीद भाई, फारुकी, किरण वानखेडे,रेणू सोनटक्के, पल्लवी वानखेडे, मंजू झाडे, फैजान शेख, नदीम शेख, ऐजाज कुरेशी, बबलू कुरेशी याच सोबत इतर संडे मार्केट व्यावसायिकांची उपस्थिती होती.