• Advertisement
 • Contact
More

  क्रांती दिवसा पासून स्वतंत्र विदर्भासाठी व विजेसाठी नागपूरला शहीद चौकावर बेमुदत ठिय्या आंदोलन

  विदर्भ राज्य आंदोलन समिती

  चंद्रपुर :- स्वतंत्र विदर्भ राज्याची त्वरीत निर्मिती व्हावी, कोरोना काळातील संपूर्ण बीज बिल सरकारने भरावे, किमान 200 यूनिट निशुल्क करावे तसेच शेतकऱ्यांचे विज बिल माफ करावे व पेट्रोल-डिझेल-गॅसची दरवाढ त्वरीत मागे घ्यावी यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे ९ ऑगस्ट २०२१ ला विदर्भ चंडीका मंदीर, शहीद चौक, नागपूर येथे बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला संपूर्ण विदर्भातून हजारो विदर्भवादी ठिय्या आंदोलनात सामील होणार आहे. ९ ऑगस्टला विदर्भ चंडीका देवीला साकडे घालून महाआरती करून दु. १ वा. ठिय्या आंदोलनाला शुभारंभ होईल.

  सन १९९७ ला भाजपाच्या कार्यकारिणीमध्ये भुवनेश्वरला वेगळ्या विदर्भाचा ठराव केला. परंतु अटलजींनी उत्तरांचल, छत्तीसगड, झारखंड हे तिन राज्याची निर्मिती केली परंतु विदर्भ दिला नाही. विदर्भाच्या जनतेवर तेव्हाही भाजपने अन्याय केला.
  २०१४ मध्ये निवडणूकीत तुम्ही आमचे भाजपाचे सरकार आणून द्या आम्ही विदर्भ देतो असे विदर्भातील जनतेला आश्वासन देऊन भाजपाच्या नेत्यांनी देवेंद्र फडणविस व नितीन गडकरी यांनी मते मागीतली परंतु महाराष्ट्रात सत्ता मिळाली, केंद्रातही भाजपाची सत्ता होतीच व केंद्रालाच राज्य निर्मितीचे अधिकार असतानाही भाजपाने विदर्भ न देऊन विदर्भाच्या जनतेशी बेईमानी केली आहे ही जनता विसरणार नाही.
  कोरोना महामारीमुळे उद्योग, व्यापार, व्यवसाय बंद झाल्यामुळे रोजगार नाही, क्रयशक्ती संपली म्हणून
  कोरोना काळातील वीज बिल राज्य सरकारने भरावे व २०० युनिट वीज फ्री करून नंतरचे वीज दर निम्मे करावे ही आमची आग्रहाची मागणी आहे. पेट्रोल-डिझेल-गॅसचे दर प्रचंड वाढल्यामुळे सामान्य जनतेचे आर्थिक गणितच बिघडले आहे. किमती त्वरीत मागे घ्याव्या ही पण मागणी आहे.
  भाजपाने कबूल करूनही व सध्या सत्तेमध्ये असून सुद्धा विदर्भ न देऊन विदर्भाच्या जनतेशी बेईमानी केली आहे. तसेच काँग्रेसनेही कबूल करून ६० वर्ष सत्तेत राहूनही त्यांनीही विदर्भ दिला नाही यांनीही विदर्भाला धोका दिला आहे.
  ९ ऑगस्टचे हे क्रांती दिवसापासून सुरू होणारे ठिय्या आंदोलन विदर्भस्तरीय आहे. भाजपच्या केंद्र सरकारने विदर्भ न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. विदर्भ मिशन २०२३ अंतर्गत आम्ही २०२३ च्या अगोदर विदर्भ घेणारच आहो व ते भाजपाला द्यावेच लागेल. आमचा नारा आहे “भाजपा सरकार द्या अन्यथा विदर्भातून चालते व्हा”, “भाजप सरकार चले जाव”, ९ ऑगस्टला चले जावची घोषणा करूनच ठिय्या आंदोलन सुरू होईल.