• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    लसीकरण जनजागृती रथ चे पुष्पवर्षावाने ताडाळी गावात स्वागत

    चंद्रपुर :- जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान चंद्रपूर अंतर्गत कोविड 19 लसीकरण जनजागृती रथ चंद्रपूर जिल्ह्यात फिरत असून अनेक गावात या रथ च्या माध्यमातून लसीकरण बाबत अफवा आणि गैरसमज दूर करण्याचे काम सार्थक होत आहे.

    चंद्रपूर तालुका समन्वयक मनोज सोदारी या रथचे सारथी बनले आहे आणि चालक विलास रामटेके सोबतीला सहमित्र बनून चंद्रपूर तालुक्यात जनजागृती करत आहे.ह्या उपक्रमाला सर्वत्र बहुतेक गावकरी लोकांनी प्रोत्साहन दिले असून बऱ्याच ग्रामपंचायतींनी कुतूहलाने कौतुक सुद्धा केले आहे. रवीवार 11 जुलै ला ताडाळी गावात हा रथ दाखल झाला. यावेळी ग्रामपंचायत ताडाळी सरपंच संगीता पारखी आणि उपसरपंच निकीलेश चामरे यांच्या हस्ते पुष्पवर्षाव करून रथ चे थाटा – माटात स्वागत करण्यात आले. लस सुरक्षित आणि प्रभावी आहे. ही लस घेतल्याने कुठलाही घातक परिणाम शरीरावर होत नाही, शंभर टक्के लसीकरण होणे म्हणजे कोविड पासून सुरक्षा असे रथ सोबत लावलेल्या ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून आणि रथ च्या सभोवताल लावलेल्या चित्र फलक मधून गावात जनजागृती करण्यात आली.यावेळी गावातील जेष्ठ नागरिक इंदिरा जुनघरे,नथाबाई खिरटकर,बुलकाबाई झाडे,चंद्रकला धांडे तसेच गावकरी वर्ग आणि बालकवर्ग उपस्थित होता.रथ स्वागत समारोह यशवितेसाठी यशवंत धांडे, कुणाल वंजारी, प्रणय मेश्राम, बेबी चामरे, अमित पारखी यांनी परिश्रम घेतले.