• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  भ्रष्टाचारी व पदाचा दुरुपयोग करणाऱ्या तहसीलदार होळी यांची विभागीय चौकशी करून निलंबित करा.

  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री यासह विभागीय आयुक्त यांच्याकडे मागणी,

  चंद्रपूर : मूल तहसीलदार होळी हे रेती घाट व्यावसायिक व अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांकडून लाखों रुपये बेकायदेशीर वसुली करून शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडवित असल्याने त्यांच्या कार्यकाळातील संपूर्ण निर्णयाची, रेती घाट आणि रेती चोरी संदर्भातील काढलेल्या आदेशाची विभागीय चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार व विभागीय आयुक्त यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देऊन केली आहे..

  मूल चे तहसीलदार होळी यांचा राजुरा व आता मूल येथील कार्यकाळ अत्यंत वादग्रस्त राहिला असून आपल्या पदाचा दुरुपयोग करून त्यांनी रेती घाट व्यावसायिक व अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांकडून कोट्यावधी रुपये गैरमार्गाचा अवलंब करून मिळविले यात शासनाचा महसूल बुडवला आहे. ज्या अवैध रेती वाहतूक व रेती चोरी प्रकरणात शासनाच्या खात्यात दंड रूपाने पैसे जायला हवे तिथ होळी यांनी स्वताच्या खिशात ते पैसे टाकले. त्यामुळे शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल त्यांनी बुडविला असल्याचा आरोप पत्रकार परिषद घेऊन राजू कुकडे यांनी लावला आहे.

  मूल तालुक्यात जवळपास 18. रेती घाटाचे लिलाव झाले आहे, त्या रेती घाट व्यावसायिकांकडून तहसीलदार होळी हे महिन्याचे 1 लाख रुपये घेतात तर रेती घाटात अवैधरित्या जेसीबी मशीन चालवस्या जाते त्या मशीनचे दंड म्हणून तहसीलदार होळी यानी ‘जवळपास प्रतेकी 7 लाख रुपये घेतले असल्याची माहिती आहे. अशातच मौजा चिंचाळा येथील जवळपास 20 ते 22 ट्रक्टर रेती ही स्थानिक तलाठी व मंडळ अधिकारी यांनी तहसीलदार होळी यांच्या आदेशाने जस केली ती रेती चोरट्यांनी चोरून नेली पण तहसीलदार होळी यांनी दीड महिना उलटल्यानंतर सुद्धा त्याचा तपास केला नाही व उरलेली रेली ही घरकुल लाभार्थ्याना दिली असल्याची माहिती तलाठी देत आहे. परंतु घरकुले लाभार्थ्याना रेती देण्याचा आदेश झाला का? याबाबत काहीही माहिती नाही.