• Advertisement
  • Contact
More

    तक्रार मागे घेण्यास युनियन तसेच वेकोलीचे कर्मचारी दबाव आणत असल्याचा आरोप पीडित महिलेने केला

    तक्रार मागे घेण्यास युनियन तसेच वेकोलीचे कर्मचारी दबाव आणत असल्याचा आरोप पीडित महिलेने केला असून पीडित महिला न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.घुग्गुस येथील इंदिरा नगर येथील रहिवासी शोभा थाटे ही पीडित महिला वेकोलीच्या कॉटर मध्ये भाड्याने राहत होती. तिच्याकडून चार वर्षकरिता नंदकिशोर पाटील या इसमाने 60 हजार रुपये घेतले होते.मात्र काही दिवसातच पाटील या इसमाने तिला शिवीगाळ करून कॉटर खाली करण्याची धमकी दिली.तसेच नंदकिशोर पाटील याने आपल्या भावाला बोलावून त्या महिलेच्या घरातील सामान सुद्धा फेकून दिले. तसेच वेकोलीच्या कर्मचाऱ्यांनी तिच्या घरातील वीज पाणी बंद केले.त्यानंतर ही महिला मुलाबाळासोबत उघड्यावर आली आहे.

    याची तक्रार पीडित महिलेने घुग्गुस पोलिसात केली. पोलिसांनी नंदकिशोर पाटील विरुद्ध कलम 504 व 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर ही पीडित महिलेचे पैसे परत करत नसल्याने तिची मानसिक स्थिती खालावत असून तिच्यावर उपचार सुद्धा सुरू होते.अशातच आता तक्रार मागे घेण्यासाठी तिच्यावर वेकोलीचे काही कर्मचारी व इंटक युनियनच्या नेत्यांकडून दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

    नौशाद शेख घुग्घुस प्रतिनिधि, सर्च टि, व्ही,