• Advertisement
  • Contact
More

    तालुक्यात अट्टल धुमाकूळ घालणारे मोटरसायकल चोर जेरबंद ,11 मोटरसायकल जप्त सिंदेवाही पोलिसांची कारवाई

    (प्रशांत गेडाम)


    सिंदेवाही – तालुक्यात व इतर परिसरात मोटर सायकल चोरीला जाण्याचे प्रकार खूप वाढला होता त्यामुळे पोलीस ठाणेदार घारे यांच्या मार्गदर्शनात पोलिस स्टेशन चे पीएसआय ठाकरे व येथील डीबी पथकातील पोलिस हवालदार सोनुले पोलीस शिपाई ज्ञानेश्वर डोकळे, सतीश निनावे , राहुल रहाटे यांनी मोटर सायकल चोरट्यांच्या शोध घेणे चालू केले व चौकशी करत असता आरोपी रमेश सांडेकर वय 49 रा.सिंदेवाही ,२) अमोल अमोल दडमल 28 गडचिरोली 3)राजेश अन्नेवार रा. चंद्रपूर हे पोलिसांना मिळुन आले असता पोलीस स्टेशन येथे त्या तिघांचे झडती व चौकशी केले असता त्यां तिघांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. परत त्या तिघांचे सखोल चौकशी केली असता त्या तीघानी विविध कंपनीच्या अकरा मोटरसायकल या चोरी करून आणल्या असल्याचे त्या तिघांनी सांगितले असता लगेच पोलिसांनी त्या चौकशी दरम्यान आरोपी नी चोरी केलेल्या अकरा मोटरसायकल पोलीस स्टेशन येथे जप्त केल्या आहेत व त्या तीन आरोपी विरुद्ध कलम -379(34)भादवि प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे व तिघा मोटर सायकल चोरटे आरोपीला न्यायालयात हजर केले असता चंद्रपूर येथील कारागृहात त्यांची रवानगी केले आहे