• Advertisement
  • Contact
More

    तालुक्यातील मोहाळी नलेश्वर येथील हिरा सायकल स्टोअर्स दुकाना ला लागली भीषण आग

    प्रशांत गेडाम

    सिंदेवाही – आज शनिवार 11 सप्टेबर ला तालुक्यातील मोहाळी नलेश्वर येथील हीरा सायकल स्टोअर्स व टू व्हीलर स्पेअर पार्ट दुकाना ला आज सकाळी अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही पोलीस घटनास्थळी रवाना झाली असुन सोबत अग्निशमन दल सुद्धा रवाना झाले होते. अशी माहिती पोलिस विभागाकडून मिळाली आहे
    अचानक लगलेल्या आगीमुळे परिसरात तनावपूर्ण वातावरण निर्माण झाले असुन सदर सायकल स्टोअर्स व टू व्हीलर स्पेअर पार्ट दुकान हे हिराचंद नानाजी वाघमारे वय -34 रा.मोहाळी यांच्या मालकीची आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागलेले आहे असे त्यांनी सांगितले या अचानक लागलेल्या आगीमुळे त्यांचे दुकानातले सामान जळून खाक झाल्यामुळे त्यांचे चार लाखाचे नुकसान झालेले आहे. अशी माहिती सायकल स्टोअर्स व टू व्हीलर स्पेअर पार्ट दुकान मालक हिराचंद वाघमारे यांनी दिली आहे .