• Advertisement
  • Contact
More

    तालुक्यातील शिवणी – कुकुळहेटि मार्गावर देशी दारू 9 पेट्या सह चारचाकी कार जप्त सिंदेवाही पोलिसांचे कारवाई

    (प्रशांत गेडाम)
    सिंदेवाही – तालुक्यातील शिवणी-कुकुळहेटी रोडवर रात्री बारा वाजता दरम्यान एक चार चाकी वाहन क्रमांक एम एच 04 डि वाय 20 29 असलेली मारुती कंपनीचे सुझुकी कार भरधाव वेगात त्या मार्गाने जात असता पोलिसांना दिसून आले त्या वाहनाच्या संशय आल्याने पोलिसांनी त्या वाहनांच्या पाठलाग करून ते वाहन थांबवले असता त्या चार चाकी वाहनाची झडती तसेच तपासणी केले असता त्यात 9 पेट्या देशी दारू संत्रा रॉकेट कंपनीच्या दिसून आल्या यावरून पोलिसांनी चारचाकी वाहनात असलेल्या दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडील देशी दारू 9 पेट्या व वाहतुकीस वापरलेल्या चार चाकी वाहन असा एकूण 3 लाख 47 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. असून आरोपी राजू आबोरकर वय- 49 व गोलू आत्राम वय- 28 रा. नवरगाव ता.सिंदेवाही यांच्यावर पोलिसानी अप. क्र. 354 /21 नोंद करीत कलम 65 अ 83 अंतर्गत महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सिंदेवाही ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार दामोदर परचाके यांनी केली असून पुढील तपास आत्राम करीत आहेत.