• Advertisement
 • Contact
More

  तीन दिवसांनी अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला

  घुग्घुस प्रतिनिधी

  शनिवारला घुग्घुस-बेलोरा रस्त्यावरील वर्धा नदीच्या पुलावरून उडी घेऊन रविता मंगल जुनघरी (39) रा. बहिरमबाबा नगर, घुग्घुस या महिलेने आत्महत्या केली.

    घुग्घुस पोलिसांनी रविवारला सकाळी 8 वाजता चंद्रपूर बचाव पथकास बोलावून एका बोटीने नदी पत्रात मृतदेह शोधण्यासाठी मोहीम राबविली.
  परंतु रात्री उशिरा पर्यंत महिलेचा मृतदेह आढळला नाही.
  तीन दिवसा नंतर सोमवारला दुपारी 1:40 वाजता दरम्यान बेलोरा नदीच्या काठावर महिलेचा मृतदेह आढळून आला.
   ही माहिती मिळताच घुग्घुस पोलीस स्टेशनच्या सहा.पो.नि.मेघा गोखरे, पोहवा. रंजित भुरसे, महेंद्र वन्नकवार, किशोर रिंगोले, मपोशी. रंजना नैताम यांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली.
     शिरपूर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला असता अनोळखी महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली असून मृतदेह वणी येथे शवविच्छेदणासाठी पाठविण्यात आला आहे.
   आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कडू शकले नसून पुढील तपास पोलीस करीत आहे.