घुग्गुस :- शहरात एकाच रात्री चार ठिकाणी घरफोड्या करून हजारोंचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना आज शुक्रवारी उघडकीस आली आहे. घुग्गुस शहरात सध्या चोरी तसेच घरफोड्यांच्या गुन्ह्यात वाढ होत आहे.अशातच घुग्घुस येथील रामनगर वार्ड क्रमांक ५ वेकोली वसाहतीत गुरुवारच्या रात्री चंद्रशेखर चौधरी, शोभा भोयर,प्रोमिल मंडल,जंगा ओडलु यांच्या घरात घुसून चोरी केली.तसेच रोख रकमेसह चौदा हजारांचा मुद्देमाल लंपास केला. काही महिण्या आदी, इंदिरा नगर, शात्री नगर,एकच रात्री असीस चोरी च्या घटना झाल्या होत्या,
दरम्यान आज शुक्रवारी सकाळी चोरीची हि बाब लक्षात येताच नागरिकांनी याची माहिती घुग्गुस पोलिसांना दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.घुग्गुस शहरात चोरी तसेच घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून पोलिसांनी रात्रीच्या वेळेस परिसरात गस्त घालावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.