• Advertisement
  • Contact
More

    वरोरा शहरात भरदिवसा दोन घरफोडी

    चंद्रपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून मागील दोन दिवसांत चोरट्यांनी भरदिवसा दोन ठिकाणी घरफोडी करून हजारो रुपयांची रोकड व लाखो रुपयांचे दागिने लंपास केले.
    वरोरा शहरा लगतच्या हेलन केलर नगरमध्ये जसवंत भैयालाल सरियाम हे रविवारी दुपारी चंद्रपूरला गेले होते. त्यांच्या पत्नी कामाला गेल्याने दुपारी घरी कुणीही नव्हते. हीच संधी साधून चोरट्यांनी समोरील दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील 63 हजार रुपये व दोन लाखाचे सोन्याचे दागिने घेवून पोबारा केला. पोलिसांनी श्वान पथक व ठसे तज्ञांना आणले. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याचे समजते.

    दुसरी घटना मालवीय वॉर्डात घडली. सुनील जवादे यांच्या घरी सोमवारी चोरट्यांनी प्रवेश करून घरातील 17 हजार रुपये रोख व सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले. शहरात भरदिवसा चोरीच्या घटना वाढतच असून जिल्ह्यात देखील सत्र सुरूच आहे.