• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  दोन मोबाईल चोरटयांना शहर पोलिसांची अटक

  धम्मशील शेंडे, सर्च टिव्ही प्रतिनिधी चंद्रपुर

  चंद्रपुर :- शहर पोलीस स्टेशन हददीतील बाबुपेठ रेल्वे गेट जवळ फिर्यादि उभा असतांना दोन चोरटयांनी मोबाईल हिसकावून पळ काढला.
  सदर गुह्याची तक्रार फिर्यादि ने नोंद केली असता अपराध क्रमांक 536 /21 कलम 392,34 भांदवि अंतर्गत गुन्हा दाखल करून डी बी पथकाने तपासाची चक्रे फिरविली असता संशयित व्यंकटेश कोपेलवार वय 18 वर्ष व शुभम वासेकर वय 20 वर्ष या दोन आरोपींना अटक केली असता चोरी गेलेला वीवो कंपनीचा मोबाईल किंमत 10 हजार रुपये हस्तगत करण्यात आला.

  सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शन नात तसेच पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक वाघमारे व पोलीस उपनिरीक्षक कोरडे, हेड कॉन्स्टेबल शरीफ व सर्व डी बी पथकाने केली.
  पुढील तपास हेड कॉन्स्टेबल शरीफ करीत आहेत.