नेहमीप्रमाणे गुरे चराईसाठी घेऊन गेलेल्या गुराख्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना सोमनाथ जवळील जंगलात शनिवारी घडली. गजानन आनंदराव गुरुनुले वय 65 वर्षे असे वाघाच्या हल्लात ठार झालेल्या गुराख्याचे नांव आहे.
मूल तालुक्यात वन्यप्राण्याचा मोठा संचार आहे, पाण्याच्या शोधात वणवण गावाच्या जवळ वन्यप्राणी यायला लागले आहे, काही दिवसांपूर्वी रोजगार हमी योजनेच्या कामावर गेलेल्या मजुराला डब्बा नेवुन देत असताना वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली होती, नेहमी प्रमाणे गजानन आनंदराव गुरुनुले हे बैल घेऊन चराईसाठी नेले असता शनिवारी दुपारच्या सुमारास वाघाने हल्ला करून ठार केले व सोमनाथच्या जंगलात ओढत घेऊन नेले, दरम्यान गजानन गुरुनुले हे घरी न आल्याने त्याचा शोधशोध केले असता शुनिवारी रात्री 10 वाजता दरम्यान त्यांचा मृतदेह जंगलात आढळुन आला.
मारोडा ग्राम पंचायतचे माजी सदस्य जितेंद्र गुरुनले याचे ते वडील असुन त्यांच्या पध्चात पत्नी आणि मुले आहेत घटनास्थळाला वनविभागाचे पथक आणि पोलीस पथक दाखल झाले असून पंचनामा केला. वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
