• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    वाघाच्या हल्ल्यात वृद्ध व्यक्तीचा मृत्यू

    तेंदुपत्ता संकलनाला गेलेल्या वृद्धाला वाघाने ठार मारल्याची घटना आज गुरुवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. आडकू गेडाम असे मृतकाचे नाव आहे . हि घटना ब्रम्हपुरी वन विभाग ब्रह्मपुरी अंतर्गत, नागभीड वनपरिक्षेत्रात येणाऱ्या कोसंबी – गवळी बिटातील कक्ष क्रमांक 742 मध्ये  घडली. याबाबतची माहिती मिळताच वनरक्षक के. पाटील यांनी घटनास्थळी भेट घेऊन मौका पंचनामा करून शवविच्छेदना करिता ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आले .

    वाघाचा हल्यात ठार झाल्याचा वृद्धाचा    परिवाराला वन विभागा मार्फत तात्काळ आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी सहाय्यक उपवनसंरक्षक के. आर. धोंडणे, वन परिक्षेत्र अधिकारी महेश गायकवाड ,वनरक्षक के, पाटील, क्षेत्र सहाय्यक सय्यद साहेब, देवपायली चे वनरक्षक  येडमे , इत्यादी उपस्थित होते.