• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    घरात घुसून वाघाचा महिलेवर हल्ला

    सिंदेवाही तालुक्‍यात गेल्या काही दिवसांपासून वाघ, बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे. मागील आठवड्यात सरडपार येथे बिबट्याने एका वृद्धावर हल्ला करून ठार केले, तर पवनपार येथे जंगलात मोहफुल गोळा करण्यासाठी गेलेल्या एकावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना ताजी असतानाच
    गुरुवारी साडेबारा वाजता घरात शिरून वाघाने एका वृद्ध महिळेवर हल्ला करून ठार केले. ही घटना तालुक्‍यातील चिकमारा येथे घडली. मृत महिलेचे नाव सायत्राबाई पेंदाम असे आहे. सतत घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.