• Advertisement
  • Contact
More

    पोळ्याच्या दिवशी वाघाच्या हल्यात शेतकरी ठार

    गडचिरोली तालुक्यातील राजगाटा चक येथे २७ ऑगस्ट रोजी वाघाने हल्ला करून इसमाला जखमी केल्याची घटना ताजी असतांनाच आणखी आज  मंगळवारी ऐन पोळयाच्या दिवशी  वाघाने शेतकऱ्यावर हल्ला करून ठार केल्याची घटना धुडेशिवनी शेतशिवारात घडली . नामदेव गुडी धुडेशिवनी असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
    आज पोळा सण असल्याने सदर मृतक शेतकरी नामदेव गुडी हे आपले बैल धुण्याकरिता गेले असता दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला  केला यात त्यांचा मृत्यू झाला. सदर घटनेची माहीती होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व याबाबत वनविभागाला कळविण्यात आले.  परिसरातील नागरिकांनी नरभक्षक वाघाला जेरबंद करण्याच्या सुचना केल्या पंरतु वनविभागाने कोणतीही पाऊल उचले नसल्याने पुन्हा पुन्हा अशा घटना घडत आहे. नरभक्षक वाघाला जेरबंद करण्याच्या सुचना देवूनही सदर घटना घडल्याने नागरिकांमध्ये वनविभागाप्रती आक्रोश निर्माण झाला आहे. तसेच मानव वन्यजिव संघर्ष चिघळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.