• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    वाघाने घेतले शेतकर्याचे प्राण तालुक्यातील नवेगाव (लोन.) येथील घटना

    सिंदेवाही :- वनपरिक्षेत्रा अर्तगत येत असलेल्या नवेगाव (लोनखैरी ) येथे शनिवार १७ जुलै ला सांयकाळी ७ वाजता चा दरम्यान सिंदेवाही तालुक्यातील नवेगाव (लोनखैरी) येथील शेतकरी शेतावरून संध्याकाळी शेतातील कामे आटपून घराकडे परत येत असताना झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने नवेगाव (लोन.) येथिल शेतकरी काशिनाथ पांडुरंग तलांडे वय 60 वर्ष यांच्यावर हल्ला केला त्यात काशिनाथ तलांडे यांचा जागीच मृत्यू झाला. अशी माहिती मिळताच नवेगाव लोनखैरी बीट येथील वनरक्षक यानी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतकाचे शव सिन्देवाही ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. याचा पुढील तपास सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी गोंड करीत आहेत.