• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    वाघाच्या हल्ल्यात युवक जखमी


    हळदा येथे पशुधनावर बिबट घरात घुसुन हल्ला करीत असुन मागील आठवड्यात घडलेली घटना ताजी असतानाच आज पुन्हा एका युवकावर वाघाने हल्ला करून जखमी केल्याची घटना आज दुपारी २.०० वा. घडली.हळदा येथील ज्ञानेश्वर पांडुरंग राऊत(३५) हा युवक सध्या राेवणीचा हंगाम असल्याने शेतावर गेला असता दबा धरून बसलेल्या वाघाने ज्ञानेश्वर याच्यावर हल्ला चढविला.सदर युवकाने आरडाओरडा केला असता जवळील व्यक्ती धाऊन आले असता वाघ पळुन गेला.सदर युवकाच्या मानेला व छातीवर वाघाने जखम केली असुन याची माहिती वनविभागाला देण्यात आली.वनविभागाच्या कर्मचारी यांनी सदर युवकाला आरमाेरी येथील ग्रामीण रूग्णालयात हलविले असुन सदर युवकावर उपचार सुरू आहेत.