• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  रेल्वे लाईनमुळे रामपूर येथे कृत्रिम पूरस्थिती राजुरा-गोवरी-माथरा मार्गावरील वाहतूक बंद

  राजुरा : राजुरा शहरालगत असलेल्या रामपूर वस्तीलगत वन विभागाची मोठ्या प्रमाणात जमीन आहे. यामधूनच सिमेंट व कोळसा माल वाहतुकीसाठी रेल्वे लाईन आहे. पावसाळ्याच्या दिवसात याच रेल्वे लाईन च्या दोन्ही बाजूने लांब अंतरावरून जंगलातील व इतर ठिकाणचे पाणी रामपूर वस्तीकडे येऊन राजुरा-गोवरी राज्यमार्गावर व वस्तीत पावसाळ्याच्या दिवसात पाणी शिरून कृत्रिम पूरस्थिती निर्माण होत असल्यामुळे याचा प्रवाश्यांना व रामपूर येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

  माणिकगढ (चुनाळा) येथून अंबुजा, एल अँड टी, माणिकगढ, वेकोली परिसरात माल वाहतुकीसाठी असलेली रेल्वे लाईन रामपूर वस्तीलगत गेली आहे. रेल्वे लाईन व रामपूर वस्तीलगत वन विभागाची मोठ्याप्रमाणात जमीन आहे पाऊस आला की या परिसरातील मोठ्या प्रमानात वाहून येणारे पाणी रामपूर वस्तीकडे असलेल्या उतार भागाणे येत असल्याने पावसाळ्याच्या दिवसात नेहमी राजुरा-माथरा राज्यमार्गालगत व या मार्गावर कृत्रिम पूरस्थिती निर्माण होत असून संपूर्ण परिसर जलमय होतो. काहींच्या घरात पाणी जात असल्यामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. हि समस्या नेहमीचीच झाल्याने याचा त्रास मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिकांना होत असून याच परिसरात असलेल्या प्रियदर्शनी विद्यालय रामपूर या शाळेला सुद्धा होत आहे.

  रेल्वे लाईन परिसरात रेल्वे कंत्राटदाराने मोठ्या प्रमाणात माती काढल्यामुळे मोठं मोठे खड्डे पडलेले आहे, रेल्वे लाईनच्या दुसऱ्या बाजूने कापनगाव आहे, त्या परिसरातील पाणी रेल्वे लाईन खालील पूलाने रामपूर वस्तीतच येत असते यामुळे थोड्या पावसालाही मोठ्या प्रमाणात पाणी साचत असते, यासंबंधी प्रशासनाला माहिती दिली परंतु रेल्वे विभाग याकडे लक्ष देत नसल्याने हि कृत्रिम पूरस्थिती नेहमीचीच असल्याचे पाहायला मिळत आहे, मात्र कायमचा बंदोबस्त करण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे.

  Leave a reply

  Please enter your comment!
  Please enter your name here