• Advertisement
  • Contact
More

    ट्रॅकच्या धडकेत जर्सी गाय ठार

    बुधवार 25 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता आबाजी महादेव मस्से रा. माथोली (मुंगोली) ता. वणी जिल्हा यवतमाळ हा गाई चरण्यासाठी घेऊन जात असतांना,मुंगोली बसस्टॅन्ड जवळ रस्त्यावर ट्रक क्र. एमएच 40 वाय 0534 या भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅकने एका जर्सी गायीला धडक दिली,त्यात जर्सी गायीचा जागीच मृत्यू झाला व एका दुचाकी क्र. एमएच 34 बीडब्लू 8052 ला धडक दिली यात दुचाकी चेंदामेंदा झाली. हे बघून ट्रक चालक येथून फरार झाला हा ट्रक बबलू खान यांच्या मालकीचा आहे.
    ही माहिती मिळताच गावकरी गोळा झाले व 50 हजार नुकसान भरपाई साठी दोन तास चक्काजाम केला.