• Advertisement
  • Contact
More

    9 वर्षीय मुलीला ट्रकने चिरडले – चंद्रपूरातील ताडाळी येथील घटना

    9 वर्षीय मुलीला ट्रक ने चिरडल्याची घटना चंद्रपूरातील ताडाळी येथे घडली असून पडोली पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.चांदणी कश्यप असे मृत मुलीचे नाव आहे. ताडाळी परिसरात विदर्भ सिमेंट नावाची पाईपची फक्ट्री आहे. मृत मुलीचे आईवडील तेथे काम करत होते.अशातच मृत मुलगी सुद्धा त्यांच्या सोबत फक्ट्री मध्ये गेली होती. मात्र ती परिसरात असलेल्या मातीच्या ढिगाऱ्याजवळ खेळत असतानाच ट्रक चालकाने तिला चिरडत नेले. याची माहिती परिसरात काम करत आलेल्या कामगारांना मिळताच त्यांनी मुलीला रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

    या घटनेची माहिती पडोली पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. तसेच ट्रक चालकाला अटक करण्यात आली. ट्रक चालक हा दारूच्या नशेत असल्याची माहिती कामगारांनी दिली .विदर्भ सिमेंट फक्ट्री चे जैनुद्दीन जव्हेरी व इब्राहिम जव्हेरी यांनी पीडित कुटुंबातील सदस्यांना 25 हजार रुपये घेऊन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुद्धा केल्याचा आरोप यावेळी मृत मुलीच्या नातलगांनी केला आहे.