• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    दुर्घटनेत वेकोलि कामगार ठार, दोन जखमी

    राजुरा :- राजुरा तालुक्यातील वरोडा ते नांदगाव सूर्या या रस्त्यावरून जाणार्‍या दुचाकी वाहनाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका वेकोलि कामगाराचा मृत्यू झाला असून त्याची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. मृतक धिडशी येथील रहिवाशी असून तो गोवरी डीप कोळसा खाणीत कार्यरत होता.
    नांदगाव सूर्याचा या गावाजवळ राजुरा – कवठाळा रस्त्यावर 19 जुलैला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास दोन दुचाकी वाहनांची जबर धडक झाली. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू तर दोन जन गंभीर जखमी झाले आहेत.
    मिळालेल्या माहितीनुसार नांदा येथील प्रफुल जमदाडे हा एमएच 34 व्हीए – 7516 या दुचाकीने चंद्रपूर वरून येत असताना नांदगाव ( सूर्याचा ) गावाजवळ दुचाकीने येणार्‍या महादेव कौरासे, वय 53, दुचाकी क्रमांक एमएच – 34 वाय 6533 ने जोरदार धडक झाल्याने हे दोन दुचाकी चालक व महादेव कौरासे यांची पत्नी मंगला गंभीर जखमी झाले. महादेव यांना डोक्यावर आणि तोंडावर गंभीर मार लागल्याने पूर्ण रक्तबंबाळ झाले होते. घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलिसांनी महादेव कौरासे आणि त्यांच्या पत्नीला राजुरा येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात केले, मात्र महादेव कौरासे ला डॉक्टरांनी मृत घोषित केले . घटनेचा पुढील तपास राजुरा पोलिस करीत आहे. मंगला कौरासे व प्रफुल्ल जमदाडे यांना चंद्रपूर येथील दवाखान्यात भरती करण्यात आले आहे.