• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    दुचाकी चोरटयास मूल पोलिसांनी केली अटक

    मूल :- फिर्यादी नामे मेघशाम दादाजी लैनगूरे वय ३८ वर्षे व्यवसाय मजूरी रा. डोंगरगाव ता मुल यानी दिनांक २०/०७/२०२१ रिपोर्ट दिली की, त्यांची जुनी वापरती मोटार सायकल क MH34 T 6675 काळ्या रंगाची हिरो स्पेंडर प्लस ची चेचीस नंबर 05L16F02872 इंजीन नंबर 05L15E07372 किमंत अंदाजे १५,०००/- रू दि २०/०६/२०२१ चे रात्री १०:०० वा ते दिनांक २१/०६/२०२१ चे सकाळी ०६:०० वा दरम्यान कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेली अशी तक्रार दिल्याने पो स्टे मुल येथे दिनांक २०/०७/२०२१ रोजी अप क ३३०/२१ कलम ३७९ भादवी प्रमाणे गुन्हा नोंद आहे. जि चंद्रपूर

    पो स्टे मुलचे डी बी पथक सदर गुन्हयाचा तपास करीत असतांना दि.२०/०७/२१ रोजी गुप्त बातमीदाराकडून माहीती मिळाली की, मौजा चिचाळा येथील नामे येथील नामे देविदास श्रावण बोबाटे यांने मागील एक महीन्यापुर्वी जुनी मोटार सायकल विकत घेतल्याची माहीती मिळाल्याने खात्री करणेकरीता फिर्यादीसह देवीदास बोबाटे रा. चिचाळा याचे घरी गेला असता ती गाडी गुन्हयात चोरी गेलेली मोटार सायकल क MH34T6675 काळ्या रंगाची हिरो स्पेंडर प्लस असल्याचे फिर्यादीने ओळखले वरून मोटार सायकल जप्त करून सदर मोटार सायकल बाबत विचारपूस केली असता त्यांनी मोटार सायकल दिलीप गणपत मानकर रा. डोंगरगाव ता. सिंदेवाही याने आणून दिल्याचे सांगीतल्याने सदर आरोपीच्या शोधकामी मौजा डोंगरगाव येथे गेलो असता सदर आरोपी घरी हजर मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून गुन्हयात अटक केली असून तपास सुरू आहे.

    सदरची कार्यवाही मा. सहायक पोलीस अधिक्षक श्री अनूज तारे सा.,यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन मुलचे पो.नि. श्री सतिशसिंह राजपूत सा, पोउपनि पुरुषोत्तम राठोड, नापोअं चिमाजी, पोअं श्रावण, गजानन, संजय, यांनी केली आहे.