शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील उकनी खदान परिसरात तीन तार चोरट्याना अटक करण्यात आली. दि.13/8/2021 ला पोलीस स्टेशन येथे उकनी खदान परिसरातून 25 फूट केबल किंमत 10 हजार चोरीचा गुन्हा दाखल झाला. दोन तासातच ठाणेदार सचिन लुले यांनी त्याठिकाणी भेट दिली शोध सुरु असतांना एका नाल्यात तीन आरोपी महेश बासु दुर्गे (22), नसीम निजामुद्दीन शेख (31), श्रीकांत सुरेश आगदारी (28) सर्व रा. घुग्घुस केबल मधील तांब्याचा तार काढून जाळत दिसले त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ, अप्पर अधीक्षक खंडेराव धरणे, उप विभागीय अधिकारी संजय पूजलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सचिन लुले, प्रमोद जुनूनकर, अनिल सुरपाम, विनोद मोतेराव, विजय फुल्लूके यांनी केली.
प्रमोद जुनूनकर यांच्याशी पत्रकारांनी संपर्क साधला असता ते फोन उचलत नाही.
