• Advertisement
  • Contact
More

    थकित मानधन तात्काळ द्या, अन्यथा कामबंद आंदोलन, उमेद अभियानातील महिलांचे जिल्हा परिषदेच्या सभागृहात ठिय्या

    महाराष्ट्र राज्य जीवनन्नोती अभियान अंतर्गत उमेद अभियान राबविले जाते. या अभियानात काम करणार्‍या समूह समन्वयक अन्य कर्मचार्‍यांना मागील 18 महिन्यांपासून मानधन दिल्या गेले नाही. त्यामुळे या अभियान काम करणार्‍या शेकडो महिलांनी जिल्हा परिषदेवर धडक दिली. थकित मानधन तात्काळ द्या, अन्यथा कामबंद आंदोलन करू, असा इशारा या महिला कर्मचार्‍यांनी दिला आहे. त्यानंतर मानधन न मिळाल्यास गावखेड्यात उमेद अभियानाचे काम रोखू, असा इशारा या कर्मचार्‍यांनी दिला. मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यपालन अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, प्रकल्प संचालक आमदार, खासदार यांना दिले.