• Advertisement
  • Contact
More

    उमेद अभियानामध्ये कार्यरत असलेल्या समुदाय संसाधन व्यक्तीचें मानधन द्या ; आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मागणी

    चंद्रपूर : ग्राम विकास विभागाअंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामध्ये वरोरा – भद्रावती मतदार संघात ३०० समुदाय संसाधन व्यक्ती कार्यरत आहेत. त्यांना अभियानाकडून मासिक मानधन दिले जाते परंतु त्यांना माहे एफिल २०२० पासून मानधन मिळालेले नाही. सादर समुदाय संसाधन व्यक्ती कोरोना महामारीचा काळात सुद्धा जनजागृती, माक्स तयार करणे लसीकरण यासोबतच अभियानाचे उद्दिष्ट पूर्तीसाठी काम करीत होते. तरीदेखल त्यांना अद्याप मानधन मिळालेले नाही. त्याकरिता आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी स्वतः मुंबई येथे जाऊन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन हा लोकहितकारी विषय लवकर मार्गी लावण्याची विनंती केली.
    त्यासोबतच त्यांनी या कर्मचाऱ्यांना मागील दीड वर्षांपासून कोणतेही मानधन प्राप्त न झाल्याने त्यांना काम करतांना अडचणी येत आहेत. जिल्हा स्तरावर विचारणा केली असता राज्य स्तरावरून निधी प्राप्त झाल्या नसल्याचे समजले हि बाब मंत्री महोदयांच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी निदर्शनास आणून दिली. मंत्री महोदयांनी देखील याबतीत त्वरित निर्णय घेऊन हा प्रश्न निकाली काढला जाईल असे आस्वासन दिले.