• Advertisement
  • Contact
More

    विरुर स्टेशन – चुनाळा – सिंधी रेल्वे रुळावर आढळले अज्ञात मृतदेह

    चंद्रपुर :- आज दिनांक 1 ऑगस्ट रोजी पहाटे गावकऱ्यांना सिंधी – चूनाळा रेल्वे रुळा वरती अज्ञात व्यक्ती चे मृत देह दिसले असता गावकऱ्यांनी विरुर पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक श्रीकृष्णा तिवारी यांना याची माहिती दिली व त्यांनी लगेच पो.ह.वा. उष्टू पेंढारकर, पो.शी. मडावी यांना मोक्या वरती पाठविले. मोक्या वरती गेले असता काही गावकरी सांगत होते की कोणत्या तरी धावत्या ट्रेन मधुन ही व्यक्ती पडली असे आम्हाला दिसले आणि त्याचा कडे काही समान नव्हते आणि त्यांचे वय अंदाजे 50-55 या दरम्यान असेल असे गावकऱ्यांनी चर्चेत सांगितले असता पोलिस निरीक्षक तिवारी यांच्या मार्गदर्शनात मोका पंचनामा करुन अज्ञात मृतदेह शवविच्छेदना करिता उप जिल्हा रुग्णालय राजुरा येथे पाठविन्यात आले आहे. पुढील तपास विरुर पोलिस स्टेशन चे कर्मचारी पो.ह.वा. पेंढारकर करीत आहेत.