• Advertisement
  • Contact
More

    वैनगंगा नदीच्या पुलावरून युवकाने मारली उडी.

    सावली(सूरज बोम्मावार)
    चंद्रपूर-गडचिरोली मुख्य महामार्गावरील  वैनगंगा नदीच्या पुलावर उभा राहून एका युवकाने नदीत उडी मारल्याची खळबळ जनक घटना काही वेळा पूर्वीच घडली आहे.
    बंडू सुधाकर हजारे रा. अंतरगाव ता. सावली, जिल्हा चंद्रपूर येथील युवक आहे. उडी मारण्याचे कारण अद्याप समजले नाही. या बाबत सावली पोलीस स्टेशन ला माहिती देण्यात आलेली आहे. घटना स्थळी बघ्यांची गर्दी वाढलेली आहे.