• Advertisement
  • Contact
More

    वर्धा नदीपात्रात सापडला इसमाच्या मृतदेहाचा सांगाळा

    चंद्रपूर तालुक्यातील  नकोडा येथील  वर्धा नदीच्या पात्रात  एका अनोळखी इसमाचा कुजलेला मृतदेह शुक्रवारी 13 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास आढळला. वर्धा नदी पात्रात  एका अनोळखी इसमाचे मृतदेहाचा सांगाळा  तरंगत आहे, अशी माहिती नागरीकांनी पोलिसांना दिली.  
    ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक  राहुल गांगुर्डे, सहायक  पोलीस निरीक्षक मेघा गोखरे, संजय सिंग, पोलीस हवालदार  अवधेश ठाकूर, सुधीर मत्ते, महेश मांढरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून मर्ग दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास  घुग्घुस पोलीस करीत आहे .