• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    वीज पडून आई व दोन मुलींचा जागीच मृत्यू, वरवट येथील घटना

    वीज पडून आई व दोन मुलींचा जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना आज मंगळवारी दुपारचा सुमारास चंद्रपूर शहरालगत असलेल्या वरवट या गावात घडली. संगीता रामटेके रागिणी रामटेके व प्राजक्ता रामटेके असे मृतकांची नावे आहेत.दुपारच्या सुमारास आई सह दोन्ही मुली घरासमोरील अंगणात बसून असताना अचानक वीज कोसळली. या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला. मात्र त्यांच्या मृत्यूविषयी अजूनही सस्पेन्स कायम आहे.वीज कोसळल्याने किंवा विजेच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्‍त करण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवाला नंतरच तिघांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, पुढील तपास दुर्गापूर पोलिस करीत आहे.