• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    ग्रामीण भागातील थकित विजबिलापोटी पथदिव्‍यांचे विज कनेक्‍शन कापण्‍याची मोहीम त्‍वरीत थांबवावी अन्‍यथा आंदोलन करू – आमदार सुधीर मुनगंटीवार

    चंद्रपूर जिल्‍हयात अनेक ग्राम पंचायत क्षेत्रात पथदिव्‍यांचे विज कनेक्‍शन थकित विजबिलापोटी खंडीत केले जात आहेत. हा जिल्‍हा विज उत्‍पादक जिल्‍हा आहे. अनेक ग्राम पंचायती या वनव्‍याप्‍त क्षेत्रात आहे. जंगली श्‍वापदांचे हल्‍ले सातत्‍याने होत आहेत. जिल्‍हयातील ११ तालुके मानवविकास निर्देशांकात मागे आहे. अशा परिस्‍थीतीत थकित विज बिलापोटी पथदिव्‍यांचे विज कनेक्‍शन कापणे ही बाब अन्‍यायकारक आहे. ही मोहीम त्‍वरीत थांबविण्‍यात यावी, अन्‍यथा आम्‍हाला आंदोलनासाठी रस्‍त्‍यावर यावे लागेल, असा ईशारा विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आमदार . सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.