• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    वेकोलि काेळसा विक्री गैरव्यवहार व कामगारांचे शोषण विरोधात के. के. सिंग यांचे अन्नत्याग आंदोलन

    चंद्रपुर :- काेळसा विक्री आणि भूमिगत खाणीतून माती काढण्याच्या कामात कंत्राटदारासाेबत अधिकाऱ्यांची मिलिभगत व कामगारांचे होणारे शोषण याला वेकोलिचे अधिकारी जबाबदार आहेत, असा गंभीर आराेप इंटकचे के.के. सिंग यांनी पत्रकार परिषदेत केला.
    वेकाेलिच्या चंद्रपुर क्षेत्रातील काही अधिकारी कर्मचाऱ्यांचे आर्थिक आणि मानसिक शाेषण करीत आहे. वेकाेलित प्रचंड अनियमितता वाढली आहे. याकडे नियमानुसार लक्ष देणे बंधकारक असतानाही अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकडे त्यांचे पूर्ण दुर्लक्ष हाेत आहे. त्यांच्याकडून केवळ भ्रष्टाचार सुरु आहे, असे के.के. सिंग म्हणाले. १० जुलै पासून वेकाेलिच्या महाप्रबंधक कार्यालयासमाेर आंदाेलन सुरु आहे. मात्र या आंदाेलनाची दखल घेण्याऐवजी वेकाेलि व्यवस्थापनाकडून कामगारांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे के.के. सिंग यांनी काल साेमवारपासून अन्नत्याग आंदाेलन सुरु केले आहे व कामगारांना न्याय मिळेपर्यन्त हे आंदोलन सुरुच ठेवनार असल्याचे त्यानी पत्रपरीषदेत सांगीतले यावेळी कांग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष रामु तिवारी,, इंटकचे प्रमोद बोरीकर, चंद्रमा यादव, सुनिल तायडे यांचासह आदिंची उपस्तीथी होती