• Advertisement
  • Contact
More

    व्हाट्स ऍप वर स्टेट्स टाकून घेतला जगाचा निरोप, चंद्रपूर जिल्ह्यातील खडसंगी येथील घटना

    व्हाट्स ऍप वर स्टेट्स टाकून एका तरुण व्यापाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना, चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आली . २५ वर्षीय संदीप चौधरी असं या व्यापाऱ्याचं नाव असून, त्याचं चिमूर तालुक्यातील खडसंगी येथे मिठाईचं दुकान आहे. शुक्रवारी त्याने त्यांच्या व्हाट्सअप वर ‘बाय बाय’ स्टेट्स टाकले. ज्यामुळे मित्रांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मात्र त्याच्या घरी मित्र पोहचेपर्यंत, त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. 2 जुलैला संदीप चा वाढदिवस होता आणि त्याचे नुकतेच लग्न देखील ठरले होते. घटनास्थळी पोचलेल्या चिमूर पोलीसांनी आत्महत्येच्या कारणांचा तपास सुरु केला आहे.