• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  महिलेची गळफास घेऊन आत्महत्या विरुर स्टेशन येथील घटना

  चंद्रपुर :- राजुरा तालुक्यातील येत असलेल्या विरुर स्टेशन येथील मंगला हनुमंत मडावी वय 32 वर्ष स्वतःच्या घरी महिलेची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज 28/7/2021ला सायंकाळी 5 वाजता सुमारास घडली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर महिलेने एक पत्र लिहिले होते.
  मी मंगला हनुमंतू मडावी मला एक बिमारी आहे ते मला ते आतच खात आहे, माझा नवरा मला खूप प्रेम करतो, मला त्याला सोडून जायचे नाही पण काय करू जावं लागेल, आई वडिलांना माझा अखेरचा नमस्कार, मला माझ्या बाळाजवळ जायचं आहे.
  असं आत्महत्या केलेल्या महिलेने एका पत्रात लिहून ठेवलं होतं. सदर महिलेचे पती हनुमंतू मडावी हे केळझर येथील रहिवासी असून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी वीरूर येथील महिंद्र गोहणे यांच्याकडे महिन्याप्रमाणे राहुण शेतीचे काम करून आपले कुटुंब चालवीत होता.
  या घटनेचा पुढील तपास विरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कृष्णा तिवारी करीत आहे.