• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    घुग्घुस मधील युवकांचे आम आदमी पक्षात प्रवेश

    चंद्रपुर :- घुग्घुस येथे दि. 20/07/2021 रोजी सागर बिऱ्हाडे यांच्या वाढदिवसा निमित्त पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यावेळी सागर बिऱ्हाडे मित्र परिवार व आशिष पाझारे मित्र परिवार, स्वप्नील आवळे, सोनू शेट्टीयार सोबत भारी संख्येत घुग्घुस येथील नागरिकांनी आम आदमी पक्षात शहर अध्यक्ष अमित बोरकर आम आदमी पार्टी घुग्घुस यांच्या नेतृत्वाखाली त्यांचावर विश्वास दाखवून भारी संख्येत प्रवेश केला. सोबतच आशिषजी पाझारे यांना आम आदमी पार्टी घुग्घुस शहराचे सह संघटनमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले.यावेळी आम आदमी पार्टीचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मा. सूनीलजी मुसळे, उपाध्यक्ष मा. हीमायुजी अली, कोषाध्यक्ष भिवराजजी सोनी, सचिव संतोषजी दोरखंडे, संघटनमंत्री राजेशजी बेले,जिल्हा सहसचिव चांदेकरजी , रविकुमार पुपलवार बल्लारशा शहर अध्यक्ष, अभिषेक सपडी उपाध्यक्ष आम आदमी पार्टी घुग्घुस, विकास खाडे सहसचिव आम आदमी पार्टी घुग्घुस, सोशल मीडिया अध्यक्ष निखिल कामतवार, प्रशांत सेनानी युवा अध्यक्ष, संदीप पथाडे सचिव, रवी शांतलावार संघटनमंत्री, विनय कदासी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.