• Advertisement
  • Contact
More

    युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिव शिवानी वडेट्टीवार यांच्याकडून पारखी कुटुंबियांना आर्थिक मदत

    राजुरा तालुक्यातील धानोरा येथील राजू बंडू पारखी या युवा शेतकऱ्याने सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. घरातील कर्ता पुरुष गेल्याने पारखी कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. त्यामुळे युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिव शिवानी वडेट्टीवार यांच्याकडून पारखी कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात आली. स्थानिक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पारखी कुटुंबीयांची भेट घेऊन आर्थिक मदत सुपूर्द केली. त्यानंतर शिवानी वडेट्टीवार यांनी पारखी कुटुंबीयांशी फोनवरून संवाद साधत काही अडचण असल्यास संपर्क करण्याचे आवाहन केले.